Siddhi Hande
कुरकुरीत भजी हे सर्वांनाच आवडतात. आपण नेहमी कांदा, बटाटा भजी खातो. मिरची भजीदेखील खूप टेस्टी असतात.
मिरची भजी बनवण्यासाठी जास्तीत जास्त १० मिनिटे लागतात. तुम्ही नाश्त्याला झटपट रेसिपी ट्राय करा.
मिरची भजी बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी कमी तिखट, थोड्या जाडसर मिरच्या घ्यायच्या आहेत.
या मिरच्यांचे दोन तुकडे करा. त्यानंतर मध्याभागी त्याला अर्धवट कापून घ्या.
यानंतर मिरचीमध्ये मीठ भरुन ठेवून द्या. जेणेकरुन त्यातील तिखटपणा निघून जाईल.
यानंतर एका बाजूला बेसन पीठ घ्या. त्यात लाल तिखट, ओवा, मीठ टाका. त्यात पाणी टाकून मिक्स करुन घ्या.
यानंतर मिरचीतील मीठ काढून टाका. या मिरची बेसन पीठात बुडवून घ्या.
कढईत तेल गरम करा. मध्यम आचेवर मस्त मिरचीचे भजी तळून घ्या. गरमागरम चहा आणि मिरचीचे भजी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते.