Siddhi Hande
रोज नाश्त्याला काय वेगळं बनवावं, असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. तुम्ही पौष्टिक अन् चटपटीत आलू टिक्की बनवू शकतात.
उकडलेले बटाटे, रवा, कॉर्नफ्लोअर, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, लाल-तिखट, जिरेपूड, चाट मसाला, आमचूर पावडर, मीठ, ब्रेड क्रम्प्स, तेल
सर्वात आधी तुम्हाला एका भांड्यात उकडलेले बटाटे छान कुस्करुन घ्यायचे आहे.
यामध्ये कॉर्नफ्लोअर किंवा रवा, कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, लाल तिखट, चाट मसाला, आमचूर पावडर आणि मीठ टाकायचे आहे.
यानंतर हे सर्व साहित्य छान एकजीव करुन घ्या. यामध्ये पाणी टाकू नका.
यानंतर या मिश्रणाचे छान बारीक चपटे गोळे करुन घ्या. हे गोळे हलक्या हाताने दाबून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यावर एकेक आलू टिक्की ठेवा.
ही आलू टिक्की दोन्ही बाजूने छान सोनेरी ब्राउन होईपर्यंत शॅलो फ्राय करा.
ही आलू टिक्की तुम्ही पुदीन्याची चटणी किंवा दहीसोबत खाऊ शकतात.