Sakshi Sunil Jadhav
तुम्ही घरच्या घरी आणि मटारच्या साहाय्याने कुरकुरीत बाकरवडी तयार करु शकता.
हिरवे वाटाणे, हिरव्या मिरच्या, आलं, किसलेलं ओलं खोबरं,जिरं, हिगं, बडीशेप पावडर, साखर, मीठ, लिंबाचा रस, बारिक पिवळी शेव, मैदा,ओवा.
एका भांड्यात मैदा आणि चवीपुरते मीठ घालून मिक्स करा. मग त्यात तेलाचे मोहन मिक्स करुन पीठ मळा.
पीठ घट्ट मळून बाजूला ठेवा. आणि कढई गरम करा. त्यात तेल घालून हिरवे उकडेले मटार परतून घ्या. मग ते मिक्सरच्या भांड्यात घाला.
आता कढईत तेल घालून जिरं, आलं, मिरची परता. मग खोबऱ्याचा किस परता.
आता त्यात बडीशेप, वाटाण्याचे मिश्रण मीठ घालून परता. मग शेवटी गॅस बंद करुन लिंबाचा रस मिक्स करा.
आता पिठाची जाडसर पोळी लाटून त्यात चिंचेची चटणी, वाटाण्याचे सारण, शेव घालून पोळीचा रोल करुन कापा.
वडी हलक्या हाताने चपटी करुन मध्यम आचेवर तेलात परतून घ्या. आणि नाश्त्याला सर्व्ह करा.
NEXT : मॅगीसारखा दिसणारा कोकणातला हा पदार्थ कोणता? वाचा परफेक्ट शिरवाळ्याच्या पीठाची रेसिपी