Mango Pudding : आंब्यापासून बनवा टेस्टी पुडिंग; जाणून घ्या खास रेसिपी

Alisha Khedekar

दोन आंबे घ्या

दोन पिकलेले गोड आंबे निवडा, स्वच्छ धुवून साल काढा आणि छोटे तुकडे करा. यामुळे ब्लेंडिंग सोपे होते.

Mango Pudding Dessert Recipe | Saam Tv

पुडिंगची बेस तयार करा

मिक्सरमध्ये आंब्याचे तुकडे, दीड कप दूध आणि अर्धा कप साखर घालून एकसारखी गुळगुळीत प्युरी तयार करा. हीच पुडिंगची बेस तयार होईल.

Mango Puding Base | Saam Tv

कॉर्न फ्लोअर टाका

एका छोट्या वाटीत पाच चमचे कॉर्न फ्लोअर आणि चार चमचे दूध घालून नीट ढवळा. गुठळ्या राहणार नाहीत याची विशेष काळजी घ्या.

Mango Pudding Conflower | Saam Tv

मँगो प्युरी कढईत काढा

तयार मँगो प्युरी कढईत काढून मध्यम आचेवर गरम करा. सतत हलवत ठेवा, त्यामुळे मिश्रण खाली लागणार नाही आणि चव छान टिकून राहते.

Mango Puri Ready To Mix | Saam Tv

गुठळ्या होऊ देऊ नका

प्युरीला हलकी उकळी आली की, तयार केलेले कॉर्न फ्लोअरचे मिश्रण हळूहळू घाला आणि लगेच ढवळायला सुरुवात करा, गुठळ्या होऊ देऊ नका.

Mango Puree Cook | Saam Tv

मिश्रण मध्यम आचेवर ढवळा

मध्यम आचेवर सतत ढवळत राहा. काही मिनिटांत मिश्रण घट्ट होत जाईल आणि पुडिंगसारखी मऊ, क्रीमी टेक्स्चर तयार होईल.

Mango Mixture Over Medium Heat | Saam Tv

मिश्रणामध्ये लिंबाचा रस टाका

मिश्रण योग्य घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. त्यात चार ते पाच थेंब लिंबाचा रस घालून नीट मिक्स करा, यामुळे चव अधिक ताजी लागते.

Mango Puree Pudding | Saam Tv

मिश्रण बाऊलमध्ये काढा

तयार गरम मिश्रण एका बाऊलमध्ये काढा आणि थोडं कोमट होऊ द्या. लगेच फ्रीजमध्ये ठेवू नका, नाहीतर टेक्स्चरवर परिणाम होऊ शकतो.

Mango Pudding Recipe | Saam Tv

पुडिंग सेट करण्यासाठी ठेवा

बाऊल फ्रीजमध्ये किमान एक तास ठेवा. या वेळेत पुडिंग व्यवस्थित सेट होईल आणि छान घट्ट, स्मूथ टेक्स्चर मिळेल.

mango Pudding | Saam Tv

पुडिंग खाण्यासाठी तयार

सेट झाल्यावर पुडिंग बाहेर काढा, इच्छेनुसार ड्रायफ्रूट्सने सजवा आणि थंडगार सर्व्ह करा. उन्हाळ्यातील हा हलका, स्वादिष्ट आणि हेल्दी डेझर्ट सर्वांना आवडेल.

Mango Pudding Ready | Saam Tv

Next : उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो लस्सी; ५ मिनिटात होईल तयार, रेसिपी वाचा

Mango Lassi | Google
Mango Lassi Recipe: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो लस्सी; ५ मिनिटात होईल तयार, रेसिपी वाचा