Manasvi Choudhary
त्वचा व केसांसाठी व्हिटॅमिन सी सीरम फायदेशीर आहे. अनेक महिला व मुली हा सीरम वापरतात.
व्हिटॅमिन सी सीरम त्वचेला लावल्यास त्वचा उजाळण्यास मदत होते व त्वचेवरील काळे डाग कमी होण्यास देखील मदत होते.
बाजारात देखील व्हिटॅमिन सी सीरम उपलब्ध आहेत मात्र आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी केमिकल फ्री व्हिटॅमिन सी सीरम कसं बनवायचं हे सांगणार आहे.
घरच्या नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी सीरम बनवण्यासाठी व्हिटॅमिन सी पावडर, गुलाब जल, कोरफड, व्हिटॅमिन सी तेल हे साहित्य एकत्र करा.
एका भांड्यात गुलाब पाणी मिक्स करा नंतर त्यात व्हिटॅमिन सी पावडर मिक्स करा. दोन्ही मिश्रण एकत्र करून घ्या.
नंतर या मिश्रणात कोरफड आणि व्हिटॅमिन सी तेल मिक्स करा. संपूर्ण मिश्रण नीट व्यवस्थित एकत्र करा.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर तुम्ही व्हिटॅमिन सी सीरम लावू शकता. व्हिटॅमिन सी सीरम लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या. हे सीरम लावण्यापूर्वी तुम्ही पॅट टेस्ट करणे महत्वाचे आहे.