Manasvi Choudhary
चटपटीत चाट मसाला पदार्थाची चव वाढवतो. फळे, सलॅड, मसाला ताक, पाणी पुरी, शेवपुरी यामध्ये मसाला वापरतात.
बाजारापेक्षा तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने चाट मसाला बनवू शकता. चाटमसाला घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे.
चाटमसाला बनवण्यासाठी जिरे, धणे, काळं मीठ, आमचूर, सुंठ, मिरी, लवंग, मसाला, साखर, हिंग हे साहित्य घ्या.
गॅसवर एका पॅनमध्ये धने आणि जिरे भाजून घ्यायचे आहेत. हे दोन्ही खरपूस भाजल्यानंतर त्यात पुदीना पाने मिक्स करा. ती कुरकुरीत भाजून घ्या.
तयार मिश्रणात ओवा परतून घ्या यात थोडी बडीशेप मिक्स करा लवगं दाणे आणि काळी मिरी खमंग भाजून घ्या.
संपूर्ण मिश्रण भाजून झाल्यानंतर त्यात थोडीशी साखर मिक्स करा. मिश्रणात आमचूर पावडर, मसाला आणि काळे मीठ मिक्स करा.
हे तयार मिश्रण मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्या आणि नंतर एका भांड्यात काढून घ्या अशाप्रकारे घरच्या घरी सोप्या पद्धतीने चाटमसाला तयार होईल.
घरगुती चाटमसाला काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवल्यास ६ महिने ते १ वर्षापर्यंत आरामात टिकतो. त्याचा सुगंध टिकवण्यासाठी बरणीचे झाकण नेहमी घट्ट लावावे.