Manasvi Choudhary
चटपटीत चना मसाला खायला सर्वांनाच आवडते.
चना मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम चने, कांदा, लसूण पेस्ट, कडिपत्ता, कोथिंबीर, लाल तिखट, धना पावडर, हळद, हिंग आणि मीठ हे साहित्य घ्या.
चना मसाला बनवण्यासाठी चने सात ते आठ तास भिजत घाला.
यानंतर चने मस्त मऊ उकडून घ्या. कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरून घ्या.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी जीरे कडिपत्ता, लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
नंतर या संपूर्ण मिश्रणात कांदा घाला. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यत परतून घ्या.
सर्व मिश्रण परतल्यानंतर यामध्ये चने घाला नंतर मसाले घालून सर्व मिश्रण परतून घ्या.
गॅसवर छान शिजताना यामध्ये कोथिंबीर घाला.
अशाप्रकारे खाण्यासाठी चटपटीत चना मसाला तयार आहे.
NEXT: Prajakta Mali: कपाळी चंद्रकोर अन् नाकात नथ, प्राजक्ता माळीचे हे फोटो पाहिलेत का?