Manasvi Choudhary
चहामध्ये खास मसाला टाकल्यास त्याची चव बदलते.
चहा मसाला घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
चहा मसाला तुम्ही महिनाभरासाठी देखील बनवून ठेवू शकता.
चहा मसाला बनवण्यासाठी हिरवी वेलची, दालचिनी, लवंग, काळी मिरी, सुठं, जायफळ, काळीमिरी, तुळशीची पाने, खडीसाखर, बडीशेप हे साहित्य एकत्र करा.
सर्वप्रथम गॅसवर एका पॅनमध्ये वेलची, लवंग, सुंठ, दालचिनी, काळीमिरी हे एकत्र भाजून घ्या. नंतर हे सर्व मसाले एका प्लेटमध्ये काढून थंड करा.
सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्या नंतर त्यात तुळशीची पाने, बडीशेप आणि खडीसाखर घाला.
अशापद्धतीने चहाचा मसाला घरच्या घरी तयार होईल.