Sakshi Sunil Jadhav
लहान मुलांना चायनीज राइस खायला प्रचंड आवडतं, मात्र त्यांच्या आरोग्यासाठी ते धोकादायक ठरु शकतं.
आज आपण एकदम पौष्टीक आणि चायनीज राइस कसा बनवायचा हे जाणून घेणार आहोत.
कॉलिफ्लॉवर, ऑलिव्ह तेल, लसूण, कांद्याची पात, पांढरा कांदा, फरसबीच्या कोवळ्या शेंगा, गाजर,शिमला मिरची,मीठ,काळी मिरी पूड, व्हिनेगर, उकडलेल्या भाज्यांचे पाणी इ.
सगळ्यात आधी कॉलिफ्लॉवर बारिक करुन घ्यावा.
एका पॅनमध्ये तेल गरम करुन, लसूण, कांद्याची पात, कांदा, फरसबी, गाजर छान परतून घ्या.
पुढे शिमला मिरच्यांचे तुकडे घालून पुन्हा परता.
आता किसलेला कॉलिफ्लॉवर घालून नीट परतवा. आणि भाज्यांचे पाणी, व्हिनेगर घालून परता.
पुढे मीठ आणि काळी मिरी पूड मिसळून ढवळून सर्व्ह करा.