Manasvi Choudhary
गटारीनिमित्त तुम्ही खास घरच्या घरी बटर चिकनची रेसिपी ट्राय करू शकता.
चिकन, कांदा, टोमॅटो, काजू, आलं- लसूण पेस्ट, दही, लाल मसाला, काळीमिरी पावडर, मीठ, टोमॅटो, बटर, तेल हे साहित्य घ्या.
बटर चिकन बनवण्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घ्या त्याचे बारीक तुकडे करा.
चिकन ला आले लसूण पेस्ट,लाल तिखट,मीठ,दही लावून चिकन मॅरीनेट करण्यासाठी 20 मिनिटे बाजूला ठेवा.
एका कढईत बटरमध्ये उभ्या आकारात चिरलेला कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घ्या.
कांदा परतून झाल्यानंतर त्यात काजू पेस्ट मिक्स करा. नंतर संपूर्ण मिक्स थंड करू मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या.
गॅसवर एका कढईमध्ये पुन्हा मिक्सरला बारीक केले मिश्रण छान परतून घ्या नंतर या मिश्रणार टोमॅटो सॉस, गरम मसाला, मॅरिनेट केलेले चिकन मिक्स करा.
अशाप्रकारे सर्व्हसाठी बटर चिकन तयार होईल.