Rasmalai: अगदी १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा ब्रेड रसमलाई, वाचा सोपी रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ब्रेड रसमलाईसाठी लागणारे साहित्य

४ ब्रेडचे तुकडे, २ चमचे दूध पावडर, ४ चमचे फुल क्रीम दूध, ४ हिरवी वेलची, बारीक चिरलेले ड्राय फ्रुट्स, साखर गरजेप्रमाणे आणि केशर

Rasmalai. | yandex

ब्रेड कापून घ्या

सर्वप्रथम ब्रेडच्या चारही स्लाइसच्या कडा कापून घ्या. नंतर, त्यांना गोल आकारात कापून बाजूला ठेवा.

Rasmalai. | yandex

दूध उकळवा

एका भांड्यात दूध चांगले उकळवा. दूध उकळून चांगले घट्ट होईपर्यंत शिजवा.

Rasmalai. | yandex

दूध पावडर

उकळलेल्या दूधात, दूधाची पावडर घाला आणि चांगले मिसळा. नंतर, मध्यम आचेवर ३ मिनिटे चांगले शिजवा. दूधाच्या पावडरमुळे मिश्रण गोड होते. परंतु तुम्ही तुमच्या चवीनुसार या दूधात साखर घालू शकता.

Rasmalai. | yandex

ड्राय फ्रुट्स

आता यामध्ये, वेलची पावडर आणि बारीक चिरलेले ड्राय फ्रुट्स घालून चांगले मिक्स करा. आता हे १५-२० मिनिटे चांगले शिजू द्या. वेलचीचा सुगंध येऊ लागला की गॅस बंद करा.

Rasmalai. | yandex

ब्रेडचे तुकडे घाला

आता गोल कापलेले ब्रेडचे तुकडे एका प्लेटवर सजवा आणि त्यावर दूधाचे मिश्रण ओता. मिश्रण घातल्यानंतर, यावर थोडे केसर घाला ते थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. तुम्ही हे फ्रिजमध्ये देखील ठेवू शकता.

Rasmalai. | yandex

थंडगार रसमलाई तयार आहे

थंडगार रसमलाई तयार आहे. कडाक्याच्या उन्हात कुटुंबासोबत थंडगार आणि मऊ रसमलाईचा आनंद घेऊ शकता.

Rasmalai | yandex

NEXT: कॅन्सरपासून दूर राहायचंय तर आहारात 'या' 6 पदार्थाचा करा समावेश

food | freepik
येथे क्लिक करा