Sakshi Sunil Jadhav
नुकतेच नवे वर्ष सुरु झाले आहे. यातला पहिला सण म्हणजे मकर संक्रात आणि त्याआधी येते भोगी.
पुढे आपण भोगीला पांरपारिक पद्धतीने केली जाणारी भाजीची रेसिपी जाणून घेणार आहोत.
मसाल्याच्या पेस्टसाठी ६ लसणाच्या पाकळ्या, १ तुकड्याचं सुकं खोबरं, अर्धा कप पाणी, १ चमचा तीळ, १ चमचा शेंगदाणे आणि अर्धा इंच किसलेलं आलं इ.
भाजीसाठी २ चमचे धणे पावडर, तेल , कपभर चिरलेली कोथिंबीर, ६ छोटी वांगी. १ चमचा लाल तिखट मसाला, १ टोमॅटो, गाजर १ कप, बीन्स, अर्धा चमचा हळद, जिरे पावडर, चवीनुसार मीठ, १ कप पाणी, अर्धी वाटी वाटाणे इ.
सर्वप्रथम एक मिक्सरचं लहान भांडं घ्या. भांड्यात मसाल्याचे साहित्य टाकून बारिक पेस्ट तयार करा.
आता एका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल घाला. मग वाटलेला मसाला मिक्स करुन घ्या.
मसाला छान परतून घ्या. मग हळद, लाल तिखट, जिरे पावडर आणि धणे पावडर घाला.
मसाले शिजल्यानंतर, सर्व चिरलेल्या आणि बारीक केलेल्या भाज्या घाला. यावर पाणी आणि मीठ घालून झाकन लावून उकळवून घ्या.
भाज्या मऊ शिजल्या की, कोथिंबीर घालून छान सर्व्ह करा. तुमची संक्रात आनंदात साजरी करा.