Saam Tv
रोज डब्याला काय बनवायचं? हा प्रश्न प्रत्येकाच्या डोक्याचा ताप झालाय.
रोज तुम्ही पौष्टीक कडधान्यांची किंवा पालेभाजी खावून कंटाळला असाल तर झणझणीत शेवची झटपट भाजी नकदा नक्की ट्राय करा.
कांदा, टोमॅटो, आलं-मिरची-लसूण पेस्ट,गूळ,मीठ, गोडा मसाला, लाल तिखट, धने-जीरे, जाड लाल, दालचिनी, शेव, कोथिंबीर, तेल इ.
कढईत तेल गरम करून दालचिनी परतून घ्या.
आता फोडणीसाठी आल्याची पेस्ट टाकून मिक्स करून घ्या. मग त्यात कांदा-टोमॅटो परता.
आता हे मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
पुन्हा कढईत तेल गरम करा आणि त्यामध्ये हिंग, हळद आणि वाटण घाला.
आता त्यामध्ये धने-पावडर, गोडा मसाला, तिखट घालून परतून घ्या.
आता मीठ आणि चवीपुरता गूळ आणि पाणी घालून एक उकळी काढून घ्या.
आता त्यावर शेव घालून बारिक चिरलेली कोथिंबीर घालून शेवभाजी तयार करा.