Manasvi Choudhary
साऊथ इंडियन अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत त्यापैकी एक म्हणजे रवा केसरी हलवा. रवा केसरी हलवा तुम्ही देखील घरच्याघरी सोप्या पद्धतीने बनवू शकता.
रवा केसरी बनवण्यासाठी रवा, साखर, तूप, दूध, केशर, काजू- बदाम, वेलची पावडर हे साहित्य एकत्र करा.
रवा केसर हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईत तूप टाका आणि त्यात काजू, बदाम हे परतून घ्या. एका प्लेटमध्ये तुपामध्ये भाजलेले काजू आणि बदाम हे काढून घ्या.
कढईमध्ये रवा परतून घ्या. एका प्लेटमध्ये भाजलेला रवा बाजूला काढा. एका पातेल्यामध्ये दूध आणि केसर याचे मिश्रण उकळून घ्या.
कढईमध्ये थोडेसे पाणी घाला त्यात केशर घातलेले दूध देखील मिक्स करा. या मिश्रणात साखर घाला. हे मिश्रण शिजल्यानंतर त्यात भाजलेला रवा मिक्स करा आणि संपूर्ण मिश्रण चांगले परतून घ्या. मिश्रणाचा गुठळा होणार नाही याची काळजी घ्या.
मिश्रणात वेलची पावडर मिक्स करून त्यावर काजू आणि बदाम देखील घाला. अशाप्रकारे साऊथ इंडियन प्रसिद्ध रवा केसरी हलवा तयार होईल.