Saam Tv
मंगा पचडी नावाचा पदार्थ तमिळमध्ये नवीन वर्षाला आवर्जून खाल्ला जातो.
आंब्याची ही पचडी चवीला गोड, तिखट आणि मसालेदार असते.
१ चिरलेला कच्चा आंबा, दीड कप गुळ, लाल तिखट, हळद, कडूलिंबाची फुले, मोहरी, कढीपत्ता, तेल, मीठ इ.
एका पॅनमध्ये चिरलेली आंबा, पाणी, हळद आणि मीठ एकत्र करून मऊ होईपर्यंत उकळा.
मिश्रण उकळल्यावर आता गूळ घालून घ्या.
गूळ विरघळलेल्यावर लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घाला.
आता दुसरीकडे कढईत तेल गरम करा. त्यात बाकीचे सगळे साहित्य घाला.
आणि आधीच्या तयार मिश्रणात मिक्स करा. तयार आहे तुमची आंब्याची पचडी.