Kala Vatana Rassa Bhaji Recipe: मालवणी स्टाईल काळ्या वटाण्याची रस्सा भाजी घरी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

काळ्या वटाण्याची भाजी

कोकण मालवणी स्टाईल भाज्या चविष्ट लागतात. काळ्या वटाण्याची भाजी त्यापैकीच एक आहे.आज आम्ही तुम्हाला मालवणी स्टाईल काळ्या वटाण्याची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहोत.

kala vatana bhaji

सोपी रेसिपी

काळ्या वटाण्याची भाजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी सहज ही रेसिपी ट्राय करू शकता.

kala vatana Rassa Bhaji

साहित्य

काळ्या वटाण्याची भाजी बनवण्यासाठी सुके खोबरे, काळे वटाणे, आलं, लसूण, हिरवी मिरची, लवंग, मिरी, बडीशेप, दालचिनी, हळद, जिरे, मोहरी, कढीपत्ता, मीठ हे साहित्य घ्या.

kala vatana Rassa Bhaji | Google

काळे वटाणे भिजत घाला

सर्वप्रथम काळ्या वटाण्याची भाजी बनवण्यासाठी काळे वटाणे रात्रभर भिजत घाला म्हणजे ते नरम होतील. यानंतर गॅसवर कुकरमध्ये भिजवलेले काळे वटाणे, थोडेसे पाणी आणि मीठ हे शिजवून घ्या.

black peas recipe

मसाला तयार करा

मसाला वाटण तयार करण्यासाठी मिक्सरमध्ये सुके खोबरे, कांदा, आले, लसूण, हिरवी मिरची, लवंग, मिरी, बडीशेप, दालचिनी आणि हळद हे बारीक वाटून घ्या. अशाप्रकारे भाजी बनवण्याचे वाटण तयार होईल. भाजी तुमची चविष्ट लागेल.

Masala | yandex

फोडणी द्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता यांची फोडणी द्या. नंतर फोडणीमध्ये तयार केलेलं वाटण चांगले परतून घ्या. भाजीला तेल सुटलं की त्यावर झाकण ठेवा.

Fodni

मिश्रण परतून घ्या

३ ते ४ मिनिटे झालं की झाकण काढा आणि संपूर्ण मिश्रण चांगले परतून घ्या नंतर यात मालवणी मसाला घाला. मिश्रणात शिजवलेले काळे वटाणे मिक्स करा आणि थोडेसे पाणी घाला.

kala vatana Rassa Bhaji

काळा वटाण्याची भाजी

भाजीत तुम्ही चवीनुसार मीठ घाला आणि भाजी शिजवून घ्या. अशाप्रकारे तुमची मालवणी स्पेशल काळ्या वटाण्याची रसरशीत भाजी सर्व्हसाठी तयार होईल.

kala vatana Rassa Bhaji

next: Wedding Mundavalya Ritual: लग्नात नवरा व नवरीला मुंडावळ्या आणि बाशिंग का बांधतात? यामागील कारण काय?

येथे क्लिक करा...