Egg Malai Makhani Recipe: फिटनेस प्रेमींसाठी खास; झटपट तयार करा हाय-प्रोटीन अंडा मलाई मखनी,जाणून घ्या सोपी रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

प्रोटीनची डीश

अंडा मलाई मखनी ही अंडी, दही आणि काजूच्या मिश्रणातून तयार होणारी झणझणीत आणि हाय प्रोटीन रेसिपी आहे.

Egg Malai Makhani Recipe | pintrest

ग्रेव्हीची तयारी करा

तुपात कांदा आणि आलं-लसूण पेस्ट परतून त्यामध्ये काजू, मगज, दही आणि मसाले घालून मऊसर, क्रीमी ग्रेव्ही तयार केली जाते.

Egg Malai Makhani Recipe

कांद्याची चव

पुढे टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा तुपात हलके भाजून घ्या. त्याने ग्रेव्हीला फ्रेश आणि नैसर्गिक गोडवा मिळतो.

Egg Malai Makhani Recipe

मसाले मिक्स करा

काळी मिरी, जिरे, धणे, लवंग आणि कसुरी मेथी भाजून तयार केलेला मसाला या रेसिपीची खास ओळख आहे. त्यामुळे प्रत्येक घास सुगंधी आणि चविष्ट लागतो.

High Protein Egg Recipe

उकडलेल्या अंडी मिक्स करा

आता उकडलेली अंडी हलक्या तेलात आणि जिऱ्यासोबत परतून ग्रेव्हीत मिसळली जातात. त्यामुळे अंड्यांमध्ये मसाल्याची चव छान मुरते.

High Protein Egg Recipe

क्रीमी टेक्स्चरमुळे चव दुप्पट

ग्रेव्हीमध्ये दही, काजू आणि मगज प्रमाणात मिक्स करून घ्या. त्यामुळे डिशला रेस्टॉरंटसारखा क्रीमी टेक्स्चर मिळतो.

High Protein Egg Recipe

गार्निशमुळे वाढते आकर्षण

फ्रेश क्रीम, चिली ऑइल, कोथिंबीर आणि तयार मसाला घालून डिश सजवल्यावर तिचा लूक आणि चव दोन्ही जास्त आकर्षक होतात.

High Protein Egg Recipe

कशासोबत खाणार?

अंडा मलाई मखनी गरमागरम बटर नान, तंदुरी रोटी किंवा फुलक्यासोबत सर्व्ह केल्याने जेवणाचा आनंद अनेक पटींनी वाढतो.

High Protein Egg Recipe

NEXT: बाल्कनीत कबुतरांनी हैराण केलंय? 'या' सोप्या ट्रिक्स वापरून त्यांना कायमचं पळवून लावा

balcony pigeon problem | meta ai
येथे क्लिक करा