Sakshi Sunil Jadhav
बाल्कनीत बर्ड नेट बसवून घ्या. त्याने कबुतरांना आत येण्याचा मार्ग बंद होतो. हा सर्वात सोपा आणि दीर्घकालीन उपाय मानला जातो.
चमकणारी टेप किंवा जुनी CD टांगा. त्याने सूर्यप्रकाशाच्या परावर्तनामुळे कबुतर त्या जागे पासून लांब राहतात. हा कमी खर्चाचा उपाय आहे.
बाल्कनी किंवा खिडकीजवळ धान्य, भात किंवा इतर खाण्याचे ठेवू नका. तिथे काही पदार्थ असतील तर कबुतरे पुन्हा-पुन्हा त्या ठिकाणी येतात.
कबुतरांची विष्ठा लगेचच साफ करा. जागा स्वच्छ ठेवल्याने कबुतरांना तिथे पुन्हा थांबण्याची शक्यता कमी होते.
रेलिंग, एसी युनिट किंवा भिंतीच्या कडांवर बर्ड स्पाइक्स बसवल्याने कबुतरांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे ते दुसरीकडे जातात.
पेपरमिंट किंवा निलगिरीसारख्या तीव्र सुगंधाची फवारणी काही प्रमाणात कबुतरांना दूर ठेवण्यास मदत करू शकते.
बाल्कनीत काड्या किंवा घरटे दिसताच त्या नीट हटवा. सुरुवातीलाच उपाय केल्यावर कबुतरांचा कायमचा वावर कमी होऊ शकतो.
वाऱ्यामुळे हलणारे विंड चाइम्स किंवा हलक्या आवाजाची उपकरणे कबुतरांना अस्वस्थ करतात. त्यामुळे ते त्या ठिकाणी जास्त वेळ थांबत नाहीत.
कबुतरांच्या विष्ठेत जंतू आणि बुरशी असू शकतात. स्वच्छता करताना नेहमी हातमोजे आणि मास्क वापरा आणि त्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा.