Manasvi Choudhary
केसांच्या वाढीसाठी महिला अनेक उपाय करतात. मात्र कितीही उपाय केले तरी केसांची वाढ होत नाही.
अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन केमिकलयुक्त ट्रिंटमेट घेतात मात्र यामुळे केस आणखी खराब होतात. यासाठी आज आम्ही तु्म्हाला केसांच्या वाढीसाठी घरगुती सोप्या टिप्स सांगणार आहे.
नारळ तेल, कलौंजी तेल आणि कांदा हे मिक्स करून तेल तुम्ही केसांना लावल्याने केसांची मुळापासून वाढ होण्यास मदत होते.
सर्वातआधी, गॅसवर एका छोट्या भांड्यामध्ये खोबरेल तेल घ्या यात थोडे कलौंजी तेल मिक्स करा.
या तेलात कांद्याचा रस मिक्स करून ते हलके कोमट करा. हे मिश्रण केसांना लावल्याने स्कॅल्पचे रक्ताभिसरण सुधारते.
आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हे तेल तुम्ही केसांना लावून त्याची मालिश करा म्हणजे तुम्हाला फरक दिसेल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.