Sakshi Sunil Jadhav
दोन जणांसाठी अळूच्या साधारण आठ पानांची भाजी बनवता येते. त्यासाठी कांदा, लसूण, मसाले, तेल, शेंगदाणे कूट, लिंबाचा रस आणि कोथिंबीर लागेल.
सर्वप्रथम अळूची पाने नीट धुऊन घ्यावीत. चिरताना मधली जाड शीर काढून टाकल्यास भाजी खाताना कचकच लागत नाही.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, लसूण आणि कांदा टाकून परतावे.
हळद, लाल तिखट, मीठ आणि धने-जिरेपूड घालून मिश्रण परतून घ्या.
बारीक चिरलेली अळूची पाने मसाल्यात घालून नीट परतून घ्यावीत.
थोडे पाणी शिंपडून झाकण ठेवावे व मंद आचेवर पाने शिजेपर्यंत ठेवावे.
भाजी शिजल्यानंतर त्यात शेंगदाण्याचे कूट, थोडी साखर आणि लिंबाचा रस मिसळा. शेवटी चिरलेली कोथिंबीर पेरून ही सुकी भाजी ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत वाढावी.