Manasvi Choudhary
महाराष्ट्रीयन संस्कृतीत लग्नसंमारभांत अनेक चविष्ट पदार्थाची मेजवानी असते. लग्नसंमारभात कोबीची भाजी खायला चवीष्ट लागते. आचारी स्टाईल कोबी चणाडाळ भाजी घरच्या भाजीसारखी लागत नाही.
यासाठी आज आम्ही तुम्हीला कोबी चणाडाळ या भाजीची रेसिपी सांगणार आहोत.
कोबी चणाडाळ भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी चणाडाळ १ तास आधी भिजत घाला.
नंतर कोबी स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घ्या. एका कढईत गरम तेलामध्ये मोहरी आणि जिरे याची फोडणी द्या.
फोडणीमध्ये हिंग आणि कढीपत्ता घातल्याने भाजीला विशिष्ट चव येते. त्यानंतर या मिश्रणात तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण देखील परतून घ्यायचा आहे.
या संपूर्ण मिश्रणात भिजवलेली चणाडाळ १ ते २ मिनिटे परतून घ्यायची आहे. नंतर यात बारीक चिरलेली कोबी, हळद, चवीनुसार मीठ घालायचा आहे.
कढईवर झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. अशाप्रकारे कोबी चणाडाळ भाजी सर्व्हसाठी तयार होईल .