ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आंब्याचा सीझन सुरु झाला आहे. उन्हाळ्यात आंब्याचे अनेक पदार्थ बनवले जातात.
उन्हाळ्यात तुम्ही मस्त वर्षभर टिकाणारे आमपापड बनवू शकतात.
आमपापड बनवण्यासाठी सर्वात आधी आंबा १ तासभर पाण्यात भिजवून ठेवा.
यानंतर आंब्याची साल काढून त्याचे बारीक-बारीक तुकडे करा. यानंतर मिक्सरमध्ये बारीक करा.
कढईत अर्धा कप पाणी गरम करा. त्यात आंब्याचा बारीक केलेला रस टाका. १० मिनिट शिजवा.
यानंतर त्यात साखर, मीठ, गूळ आणि लिंबाचा रस टाकू सतत हलवत राहा. १० मिनिटे मस्त शिजवून घ्या.
यानंतर मिश्रण छान घट्ट होईल. यानंतर गॅस बंद करा. एक ताट घ्या. त्यावर तूप लावा. हे मिश्रण त्यावर टाकून मस्त पसरवा.
यानंतर याच्या बारीक बारीक वड्या तयार करा. त्यानंतर उन्हाळ्यात छान वाळवण्यासाठी ठेवा.
हे आमपापड तुम्ही वर्षभरदेखील खाऊ शकतात.
Next: उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून खावीत 'ही' फळं