Manasvi Choudhary
बेकरीसारखा व्हॅनिला केक घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे.
व्हॅनिला केक बनवण्यासाठी मैदा, साखर, बटर , दूध, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स आणि मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम एका भांड्यात बटर आणि साखर मिक्स करून त्यामध्ये दूध आणि व्हॅनिला इसेन्स टाका.
दुसऱ्या भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र मिक्स करा.
दोन्ही मिश्रण एकत्रित करून घ्या. मात्र मिश्रण मिक्स करतात त्याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.
केकच्या भांड्याला बटर किंवा तेल लावून मैदा मिक्स करा नंतर यामध्ये मिश्रण मिक्स करून घ्या.
ओव्हनमध्ये २५ ते ३० मिनिटे केक बेक करून घ्या . केक थंड झाल्यावर त्यावर व्हाईट क्रिमने लेअर द्या
अशाप्रकारे सर्व्हसाठी स्पॉजी व्हॅनिला केक तयार आहे.