Manasvi Choudhary
चपाती हा जेवणाच्या थाळीतील मुख्य पदार्थ आहे.
मऊ लुसलुशीत चपाती खायला सर्वांना आवडते.
मऊ चपाती बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
सर्वप्रथम गव्हाचं पीठ चाळणीने गाळून घ्या नंतर यामध्ये मीठ घाला.
त्यानंतर संपूर्ण मिश्रणात पाणी घालून मळून घ्या. पीठ आता थोड्यावेळ झाकून ठेवा नंतर हाताला थोडे तेल पीठ पुन्हा मळून घ्या.
त्यानंतर पीठाचे लहान लहान गोळे तयार करा पीठ पुरीप्रमाणे लाटून घ्या.
नंतर पीठाचे दोन भाग करा एका बाजूला तेल लावून ते फोल्ड करा फोल्ड केलेली पोळी पूर्ण गोल आकारची लाटून घ्या.
गॅसवर गरम तव्यावर थोडं तेल घाला आणि चपाती टाका. चपाती दोन्ही बाजून चांगली भाजून घ्या. अशाप्रकारे मऊ चपाती सर्व्हसाठी तयार आहे.