Sakshi Sunil Jadhav
वाढत्या वयाचा परिणाम थेट तुमच्या चेहऱ्यावर दिसत असतो.
वय वाढल्याने चेहऱ्यावरचा ग्लो जातो आणि सुरकुत्या दिसायला लागतात.
तुम्हाला जर ४५ वयाचे असून ३० वर्षांच्या महिलांसारखा ग्लो हवा असेल तर तुम्ही पुढील टिप्स फॉलो करु शकता.
सुंदर दिसण्यासाठी आधी खाण्यात फळे आणि भाज्यांचा समावेश केला पाहिजे.
चेहऱ्याचा सॉफ्टनेस वाढवायचा असेल तर अवोकाडो, मासे आणि डायफ्रुट्सचा समावेश करा.
साखरेचे कोणतेही पदार्थ खाऊ नका. त्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याच्या समस्या वाढतात.
घराच्या बाहेर पडताना सनस्कीनचा वापर कराच. हा अॅंटीएजिंगचा पहिला नियम आहे.
तुमचा फेस खूप ड्राय असेल तर सतत चेहऱ्याला मॉइश्चराइजर लावा त्याने चेहरा टवटवीत दिसेल.