Manasvi Choudhary
हिवाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते.
हिवाळ्यात घरगुती मेथीचे, डिंकाचे, खजूराचे लाडू बनवले जाते.
मात्र आज आम्ही तुम्हाला जवसाचे लाडू बनवण्याची रेसिपी सांगत आहोत.
जवसाचे लाडू बनवण्यासाठी जवस, अक्रोड, खजूर, गूळ, खसखस, तूप हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात जवस चांगले खरपूस भाजून घ्या.
नंतर एका भांड्यामध्ये थोड तूप घालून आक्रोड आणि खजूर भाजून घ्या.
आक्रोड आणि खजूर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
नंतर गॅसवर एका भांड्यात थोडे पाणी घ्या. यामध्ये गूळ घाला नंतर हे मिश्रण ढवळून घ्या.
संपू्र्ण या मिश्रणात खसखस घाला आणि हे मिश्रण एकजीव करून घ्या.
अश्या पद्धतीने तयार मिश्रणाचे गोल गोल आकारात लाडू करून घ्या.