Manasvi Choudhary
वजन कमी करण्यासाठी घरीच तुम्ही सोपे उपाय करा ज्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी कमी होईल.
कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिक्स करून प्या यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर निघते आणि मेटाबॉलिझम वाढवते.
रात्री एक चमचा जिरे पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी उकळून प्या. जिरे पचन सुधारते आणि चरबी जाळण्यास मदत करते.
पोटात सतत गॅस होत असेल तर तुम्ही ओव्याचे पाणी देखील पिऊ शकता यामुळे पोटफुगा या समस्येपासून देखील आराम मिळतो.
आहारात मूग, चणे, पनीर, अंडी किंवा डाळींचा समावेश करा. प्रथिनांमुळे पोट बराच वेळ भरलेले राहते.
आहारात हिरव्या पालेभाज्या, काकडी, गाजर आणि फळांचा समावेश करा.
रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी करा. शक्य असल्यास रात्री फक्त सूप किंवा मुगाची खिचडी खा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या,