Ruchika Jadhav
काही लोकांना 'फिट अँड फाइन' आणि सडपातळ व्हायचं आहे.
पण जीम रुटीन फॉलो करत नसल्यानं ते शक्य होत नाही.
जीम किंवा वर्कआऊट करणाऱ्यांनी बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत. तरीही काही लोक पार्ट्यांमध्ये चांगलात ताव मारतात. त्यामुळं लठ्ठपणा वाढतो.
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर, मद्यपान करू नये.
जेवताना घाई करू नये. तसं केल्यास पचनाची समस्या निर्माण होऊ शकते. वजनही वाढते.
टीव्ही बघताना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण करणं ही सामान्य बाब आहे. पण त्यानंतर लगेच झोपल्यानं पोट सुटतं. जेवल्यानंतर किमान १०० पावले चाला.
मीठ आणि साखरेचे अधिक सेवन करू नये. त्यांचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास लठ्ठपणा आणि अन्य आजारांना निमंत्रण देते.
दिवसा काही वेळ झोपणे ही चांगली बाब आहे. पण काही लोक दिवसा तीन-तीन तास झोपतात. त्यामुळे वजन वाढू शकते.