Manasvi Choudhary
साडी नेसल्यावर महिलाचं सौंदर्य आणखी खुलून येत. मात्र साडीवर नेमकी कशी हेअरस्टाईल करायची असा प्रश्न महिला व मुलींना असतो.
साडीवर सध्या अंबाडा हेअरस्टाईल ट्रेडिंगमध्ये आहे. अंबाडा हेअरस्टाईल्सच्या अनेक पॅटर्न तुम्ही खास निवडू शकता.
क्लासिक स्लीक अंबाडा ही हेअरस्टाईल तुम्ही खास काठपदरी साड्यांवर करू शकता. या हेअरस्टाईल्समध्ये केस मधून किंवा बाजूने भांग पाडून घट्ट मागे बांधले जातात.
पैठणी किंवा स्लीक साड्यांवर तुम्ही अंबाडा हेअरस्टाईल करा आणि त्यावर तुम्ही पूर्ण गजरा माळू शकता. हा ट्रेडिशनल लूक तुमचं सौंदर्य खुलून येते.
नेट किंवा शिफॉन साडी नेसली असेल तर तुम्ही मेसी अंबाडा ही हेअरस्टाईल करू शकता. केस सैलसर मागे घेऊन मानेपाशी हा अंबाडा बांधा.
ज्यांना थोडे हटके लूक हवा आहे त्यांच्यासाठी ही हेअरस्टाईल आहे. समोरून किंवा बाजूने केसांची वेणी घालत मागे या आणि त्या वेणीचा वापर करून अंबाडा बांधा.
फ्लॉवर डेकोरेटेड हा अंबाडा मध्यभागी न घालता एका बाजूला घातला जातो. एका बाजूला अंबाडा बांधून त्यावर साडीला मॅचिंग असलेली असं तुम्ही करू शकता.