ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
त्वचेला उजळवण्यासाठी आपण अनेक गोष्टी वापरतो, परंतु आपण आपले पाय दुर्लक्षित करतो. धूळ आणि घाणीच्या संपर्कात आल्यामुळे ते काळे होतात.
जेव्हा तुम्ही सँडल किंवा हील्स घालता तेव्हा काळे पाय स्पष्टपणे दिसतात, ज्यामुळे तुमचा संपूर्ण लूक खराब होतो.
जर तुमचे पायसुध्दा काळे दिसायला लागले असतील आणि पार्लरला जायला वेळ मिळत नाहिये तर घरच्या घरी सोप्या पध्दतीने पायांना गोरे आणि साफ करु शकता.
सर्वात आधी, कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिक्स करा. या पाण्यात अर्धा तास पाय बुडवा आणि नंतर स्वच्छ धुवा.
२ चमचे बेसन, चिमूटभर हळद, दूध आणि गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. ती तुमच्या पायांना लावा आणि १० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर स्क्रब करून स्वच्छ करा.
यानंतर, नारळाच्या तेलात मीठ मिसळून स्क्रब बनवा आणि त्याद्वारे तुमचे पाय एक्सफोलिएट करा. त्यानंतर, गुलाबपाणी आणि कोरफडीच्या जेलच्या मिश्रणाने पायांची मालिश करा.
या तीन स्टेप्स फॉलो केल्यानंतर पायांना टॉवेलने पुसून घ्या. पाय सुकल्यानंतर मॉइश्चरायझर लावा. आता तुमचे पाय एकदम स्वच्छ आणि चमकदार होतील.
हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा ट्राय करुन पायांना स्वच्छ ठेवू शकता. असे केल्यास पायांवर काळपटपणा दिसणार नाही आणि सुंदर दिसू लागतील .