Saam Tv
या भागांची त्वचा जाड असल्याने तसेच सतत घर्षण, कोरडेपणा आणि सूर्यप्रकाशामुळे कोपर आणि गुडघे काळवंडलेले असतात
अंघोळीनंतर कोपर आणि गुडघ्यांवर मॉश्चराईझर लावा. त्वचेतील ओलावा टिकून राहिल्याने कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
त्वचा कोरडी होते म्हणून काळी पडते. त्यामुळे त्यावर अॅलोवेरा जेल लावा. यामुळे त्वचेला मॉइश्चर मिळण्यास मदत होऊ शकते.
मृत त्वचेच्या पेशी काढण्यासाठी सौम्य एक्सफोलिएशन करा. मात्र, त्वचा जोरात घासू नका.
लिंबात मध मिसळून १५ मिनिटे पेस्ट कोपर आणि गुडघ्यांवर लावा. यामुळे त्वचेतील मेलेनिन कमी होईल आणि त्वचा उजळेल.
नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते त्यामुळे रंग सुधारण्यास मदत होते. नारळाच्या तेलाने रोज रात्री कोपरांवर आणि गुडघ्यांवर मालिश करा
कोपर आणि गुडघे कपड्यांमधून उघडे राहत असतील तर बाहेर पडताना या भागांवरही सनस्क्रिन लावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.