Manasvi Choudhary
कोणीतरी तुमच्याकडे आकर्षित होतय किंवा त्यांना तुम्ही आवडता हे सामान्य आहे. मात्र हे कसं ओळखायचं यामागे देखील कारणे आहेत.
मानसशास्त्रानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती कोणाकडे आकर्षित होते, तेव्हा त्याचे शरीर नकळतपणे काही संकेत देतात.
जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे सतत पाहत असेल किंवा तुम्ही त्यांच्याकडे पाहताच त्यांनी नजर लपवली तर हे आकर्षणाचे मोठे संकते आहे.
जेव्हा आपल्याला कोणीतरी मनापासून आवडतं, तेव्हा आपण नकळत त्यांच्या हालचालींची नक्कल करू लागतो किंवा त्याच्यासारखे करण्याचा प्रयत्न करतो ज्याला मिररिंग असे म्हणतात.
अनेकदा असं होतं की ज्या व्यक्तीला तुम्ही आवडता ती व्यक्ती तुमच्याशी जवळीक येण्याचा प्रयत्न करते, तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते
अनेकदा ज्या व्यक्तीला तुम्ही आवडता अशी व्यक्ती तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींची चर्चा करते उदा. एखादी फिरण्याची जागा, आवडता पदार्थ
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या,