Manasvi Choudhary
डायबिटीज हा सध्या गंभीर आजार झाला आहे. तरूणांपासून ते वयोवृद्धापर्यत सर्वांना डायबिटीजचा सामना करावा लागत आहे.
डायबिटीज या आजाराची लक्षणे सामान्य असली तरी याचा त्रास गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. सुरूवातील लोक डायबिटीजच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.
डायबिटीज झाल्यानंतर शरीर सुरूवातील कोणते संकेत देते? हे या वेबस्टोरीमधून जाणून घेऊया.
रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास डायबिटीजचा धोका संभवतो हे लक्षात घ्या. रक्तातील साखर वाढल्यास शरीरातून संकेत मिळतात.
जर तुम्हाला दिवसा आणि विशेषतः रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला जावे लागत असेल, तर हे रक्तातील साखर वाढल्याचे सर्वात मोठे लक्षण आहे.
वारंवार लघवीला झाल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि डिहायड्रेशन होते. यामुळे जास्त तहान लागते
कोणताही व्यायाम किंवा डाएटिंग न करता जर अचानक वजन वेगाने कमी होऊ लागते.
तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते, पण इन्सुलिनअभावी ते शरीरातील पेशींपर्यंत पोहोचत नाही. परिणामी, शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही आणि पोट भरलेले असूनही सतत भूक लागते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.