Dhanshri Shintre
भाज्या विकत घेतल्यावर त्या फ्रिजमध्ये ठेवल्यास त्या लवकर खराब होत नाहीत आणि अधिक काळ ताज्या राहतात.
फ्रिजशिवाय भाज्या ताज्या ठेवायच्या असतील, तर या सोप्या टिप्स निश्चितच तुमच्या उपयोगी ठरतील.
हिरव्या भाज्यांमध्ये नेहमी अंतर ठेवून साठवा, एकावर एक ठेवू नका, यामुळे त्या जास्त काळ ताज्या राहतात.
पालेभाज्या आणि देठ असलेल्या भाज्या पाण्यात साठवल्यास त्या जास्त काळ ताज्या आणि फ्रेश राहतात.
भाज्यांचा देठ पाण्यात बुडवून ठेवल्यास त्या हायड्रेट राहतात आणि लवकर कोमेजण्यापासून सुरक्षित राहतात.
काकडी, शिमला मिरची, वांगीसारख्या भाज्या ओल्या सुती कापडात गुंडाळल्यास त्या जास्त काळ ताज्या राहतात.
टोमॅटो आणि केळी वायुवीजन असलेल्या टोपल्यात ठेवा, यामुळे ते जास्त दिवस ताजे आणि खराब न होता राहतात.