Dhanshri Shintre
आपण रोज वापरत असलेल्या अनेक वस्तूंची एक्सपायरी डेट संपलेली असते, याची अनेकांना कल्पनाही नसते.
तुम्हाला माहिती आहे का? स्वयंपाकघरात दररोज वापरण्यात येणाऱ्या भांड्यांनाही एक ठराविक एक्सपायरी डेट असते.
स्वयंपाकघरात वापरण्यात येणारी भांडीही कालांतराने खराब होतात आणि त्यांची विशिष्ट वापराची मर्यादा असते.
काही काळानंतर स्वयंपाकघरातील भांडी बदलणे गरजेचे असते, अन्यथा ते आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात.
नॉन-स्टिक फ्रायपॅन 1 ते 2 वर्षांनी बदलणे आवश्यक असते, कारण कोटिंग खराब झाल्यास आरोग्य धोक्यात येतो.
नॉन-स्टिक कोटिंग उखडण्याआधी किंवा पदार्थ चिकटू लागण्यापूर्वी ते भांडे बदलणे आरोग्यासाठी आवश्यक ठरते.
स्वयंपाकघरात प्लास्टिक कटिंग बोर्ड वापरत असाल, तर त्याचा वापर एक वर्षानंतर थांबवून नवीन घ्यावा.
एक वर्षानंतर प्लास्टिक कुजायला लागते, त्यामुळे त्याचा वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. वेळेत तो बदला.