Saam Tv
आजकालच्या धावपळीच्या दुनियेत स्वत:च्या आरोग्याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. खाण्या-पिण्याचीही आबाळ करतो. त्यामुळे हॉर्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे.
कामात बिझी असतानासुद्धा आरोग्य निरोगी ठेवू शकतो. त्याकरिता स्वत:साठी थोडावेळ काढणे गरजेचे आहे. या काही सोप्या टिप्स केल्यात तर तुम्ही सुद्धा हॉर्ट अटॅकपासून स्वत:ला वाचवू शकता.
जेमतेम 30 मिनिटे टाचांवर उभे राहिल्याने मसल्स मजबूत होतात. काल्फ मसल्स मजबूत झाल्यामुळे ब्लड सर्क्यूलेशन वाढते. ज्यामुळे हृदयावर ताण येत नाही.
शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे गरजेचे आहे. दर 2 तासांनी पाणी पित राहणे गरजेचे आहे. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते.
कायम एका जागी बसून राहता,सतत शरीराची हालचाल करणे गरजेचे आहे. हालचालीमुळे शरीर अॅटीव्ह राहण्यास मदत होते. सकाळी उठल्यावर पायावर थंड पाणी टाकल्यास ब्लड फ्लो चांगला राहतो.
रोज व्यायाम करत असाल तर उत्तमच. पण व्यायाम करताना 15 मिनिटे पाय वर ठेवावे. असे केल्याने पायात जमलेले ब्लड हृदयापर्यंत पोहोचते. थोड्या वेळासाठी पायाच्या नसांवरील भार कमी होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.