Kitchen Hacks : टोमॅटो मऊ पडतात आणि पाणीही सुटतं? मग फॉलो करा या टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टोमॅटो मऊ पडणे

टोमॅटो पटकन मऊ पडतात आणि पाणीही सुटतं? तर या सोप्या स्टोरेज ट्रिक्स वापरा याने टोमॅटो १० ते १२ दिवस टणक, ताजे आणि टिकाऊ राहतील.

Tomato | GOOGLE

टोमॅटो निवडताना कसली काळजी घ्यावी?

थोडे टणक, बारीक डाग नसलेले, न चिरलेले टोमॅटो खरेदी करा. पिकायला आलेले किंवा जास्त पिकलेले टोमॅटो पटकन मऊ होतात आणि इतर टोमॅटोही खराब करतात.

Tomato | GOOGLE

टोमॅटो धुऊन ठेवू नये

टोमॅटो धुतले की त्यांचे बाहेरील कवच ओलसर होते. हा ओलसरपणा जास्त दिवस राहिल्यास टोमॅटो लवकर मऊ पडतात आणि कुजतात, म्हणून टोमॅटो साठवताना कधीही धुवू नका वापरायच्या वेळीच धुवा.

Tomato | GOOGLE

पेपरमध्ये गुंडाळून साठवा

प्रत्येक टोमॅटोला पेपर नॅपकिनमध्ये गुंडाळून ठेवा. नॅपकिनमध्ये गुंडाळून ठेवल्याने टोमॅटोतील अतिरिक्त ओलावा पेपर शोषून घेतो एक टोमॅटो खराब झाला तरी इतरांपर्यंत त्याचा परिणाम पोहोचत नाही याने टोमॅटो जास्त दिवस ताजे राहतात.

Tomato | GOOGLE

हवादार डब्यातच ठेवा

बंद डब्यांमध्ये ओलावा तयार होतो आणि टोमॅटो मऊ पडतात. त्याऐवजी छिद्रे असलेला, हवा खेळती ठेवणारा डबा किंवा बास्केट वापरा. याने टोमॅटो टणक आणि फ्रेश राहतात.

Tomato | GOOGLE

फ्रिजमध्ये ठेवताना योग्य पद्धत

सर्व टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवणे चुकीचे आहे. फक्त अगदी पिकलेले किंवा जास्त मऊ होऊ घातलेले टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवा.

Tomato | GOOGLE

कापलेले टोमॅटो कसे टिकवायचे?

कापलेले टोमॅटो लवकर पाण्यासारखे होतात. टोमॅटो एअरटाइट डब्यात ठेवा आणि वर एक टिश्यू पेपर ठेवा. तो अतिरिक्त ओलावा शोषून घेतो आणि चवही बदलत नाही.

Tomato | GOOGLE

टोमॅटो कांद्याजवळ ठेवू नका

कांदा आणि टोमॅटो एकत्र ठेवल्यास ते लवकर पिकतात व मऊ पडतात म्हणून कांदा टोमॅटो दोन्ही वेगळे ठेवा.

Tomato | GOOGLE

Kitchen Hacks : आलं महिनाभर ताजं ठेवायचं? मग या सोप्या ट्रिक्स नक्की फॉलो करा

Ginger | GOOGLE
येथे क्लिक करा