Kitchen Hacks : मसाले ओले होऊ नयेत म्हणून काय करावे? जाणून घ्या कमाल ट्रिक्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मसाले

मसाले ओलसर झाल्यावर त्यांचा सुगंध कमी होतो, गुठळ्या पडतात आणि चवही खराब होते.तर जाणून घ्या मसाले नेहमी ड्राय आणि ताजे ठेवण्यासाठी कमाल ट्रिक्स.

Masale | GOOGLE

एअर-टाइट बॉटल वापरा

मसाले नेहमी हवाबंद डब्यात ठेवल्यास ओलावा आत जात नाही.प्लास्टिकच्या बॉटल्सपेक्षा मसाले ठेवण्याकरिता काचेच्या बॉटल्सचा वापर करावा.

Masale | GOOGLE

बॉटलमध्ये १ टीस्पून मीठ ठेवा

मीठ नैसर्गिक ओलावा शोषक असून तो ओलावा शोषून घेतो. मीठ टाकल्यास मसाले ओलसर होण्याची शक्यता कमी होते.

Masale | GOOGLE

मसाले भरायच्या आधी बॉटल गरम करा

रिकाम्या काचेच्या बॉटलला 1 मिनिट गरम पाण्यात ठेवा आणि नंतर चांगले सुकवून घ्या. हीटमुळे बॉटलमधील ओलावा पूर्ण निघून जातो.

Masale | GOOGLE

मसाले नेहमी थंड झाल्यावरच भरावे

नुकतेच भाजलेले मसाले किंवा गरम मसाला पावडर गरम असताना भरू नका.त्याने बॉटलमध्ये वाफ तयार होते आणि मसाले ओलसर होतात.

Masale | GOOGLE

तांदळाचे 3 ते 4 दाणे बॉटलमध्ये ठेवा

तांदूळ ओलावा पटकन शोषतो. म्हणून 3 ते ४ दाणे मसाल्या मध्ये टाकावे. हा अत्यंत जुना पण सुपर-इफेक्टिव्ह ट्रिक आहे.

Masale | GOOGLE

मसाले फ्रीजमध्ये ठेवू नका

फ्रीजमधील ओलावा मसाल्यांना पटकन खराब करतो.त्याऐवजी बाहेरील ड्राय, अंधाऱ्या कपाटात ठेवा.

Masale | GOOGLE

मसाले उन्हात ठेवा

आठवड्यातून एकदा मसाले हलक्या उन्हात 20 मिनिटे ठेवले तर ओलावा कमी होण्यास मदत होते आणि चवही टिकून राहते.

Masale | GOOGLE

Kitchen Hacks: किचनमधील स्टिलची भांडी काळवंडली आहेत ? मग करा हे स्वस्तात मस्त उपाय

Kitchen Hacks | GOOGLE
येथे क्लिक करा