Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात प्रत्येकाच्या घरात डास शिरतात.
घरगुती उपाय म्हणून आपण डासांना घालवण्यासाठी काही टीप्स फॉलो करतो.
लिंबाचा रस आणि नारळ तेल एकत्र करून अंगाला लावा, उग्र वासामुळे डास जवळ फिरकणार नाही.
घराच्या दारासमोर किंवा खिडकीत तुळस लावल्याने डास दूर पळतील.
लवंगाची पूड आणि नारळाचं तेल त्वचेवर लावल्याने नैसर्गिक रिपेलंट म्हणून काम करते.
बंद खोलीत कापूर जाळा आणि दार खिडक्या बंद करा. डास नाहीसे होतील.
लसूण भाजा किंवा तेलात फोडणी द्या, लसणाच्या उग्र वासामुळे डास दूर होतील.
कोणत्याही ऋतूत घरात स्वच्छता ठेवा. तसेच कचरा जमा करून ठेवू नका.