Ruchika Jadhav
राज्यात सध्या सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे सर्वजण दुपारच्यावेळी उन्हातून बाहेर जाणे टाळतात.
उन्हाळ्यात उन्हामुळे कधी कधी घरामध्ये देखील फार गरम होतं. अशावेळी आपलं घरं थंड कसं ठेवायचं?
घर थंड रहावं यासाठी हवा खेळती राहणे गरजेचं आहे. त्यामुळे घराच्या खिडक्या कायम खुल्या ठेवाव्यात.
जर खिडकीतून फार ऊन येत असेल तर खिडकीमध्ये एक सुती कापड भिजवून सुकत टाका. याने हवा आल्यावर तुमच्या घरात थंड हवा येईल.
घरमध्ये वनस्पती झाडं असल्यास थंडावा राहतो. झाडांमुळे ऑक्सिजन मिळतो.
त्यामुळे घरात शोभा, थंडावा आणि ऑक्सिजनसाठी झाड नक्की लावा.
उष्णतेपासून वाचण्यासाठी घरात जास्तीचे दिवे लावून ठेवू नका.
शक्यतो घरामध्ये कमी विजेवर चालनारे एलइडी दिवे वापरा. त्याने घरातील हिट जास्त वाढत नाही.