Manasvi Choudhary
हिरवी मिरची तिखट असली तरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेक चवदार पदार्थ करण्यासाठी स्वयंपाकघरात हिरव्या मिरचीचा वापरतात.
हिरव्या मिरचीचे अनेक प्रकार बनवले जातात. हिरवी मिरची चटणी, लोणचे, हिरव्या मिरचीचा ठेचा हे चविष्ट प्रसिद्ध पदार्थ आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का? हिरवी मिरची व्यवस्थित साठवूण ठेवली नाही तर ती खराब होतात, लवकर सुकतात.
उन्हाळ्याच्या दिवसात हिरव्या मिरच्या लवकर सुकत असतील तर काय काळजी घ्यावी हे लक्षात घ्या.
हिरव्या मिरच्या पाण्यात धुवून स्वच्छ कोरड्या करा नंतर त्यांचे देठ काढून ठेवल्यास ताज्या राहतात.
मिरचीच्या देठामध्ये ओलावा अधिक असतो यामुळे मिरच्या लवकर खराब होण्याची शक्यता असते
मिरच्या जास्त काळ ताज्या राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवू शकता. फ्रिजमधील स्थिर टेम्परेचर मिरच्या खराब होण्याची शक्यता कमी असते.
हिरव्या मिरच्या तेलामध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकतात खराब होत नाही.
मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करा नंतर एका काचेच्या बरणीमध्ये मिरच्यांच्या मध्यभागी कापून मोहरीच्या तेलामध्ये भरून ठेवा. तेलामध्ये मिरच्या लवकर खराब होत नाही त्यांचा स्वाद टिकून राहतो.