Kitchen Hacks: कडीपत्ता एक महिना ताजा-टवटवीत कसा ठेवावा? जाणून घ्या सोप्या टीप्स

Surabhi Jayashree Jagdish

कडीपत्ता

थंड हवेमुळे कडीपत्ता पटकन सुकतो. त्यामुळे तो फ्रिजमध्ये योग्य पद्धतीने साठवणं खूप महत्त्वाचं आहे. कडीपत्ता ओलसरपणाला संवेदनशील असल्याने त्याला हवाबंद, कोरड्या आणि नियंत्रित तापमानात ठेवले तर तो 20-30 दिवस ताजा राहू शकतो.

काही सोप्या टीप्स

घरगुती काही सोप्या टिप्स वापरल्या तर त्याचा रंग, सुवास आणि चव दोन्ही टिकून राहतात. महिनाभर ताजा कडीपत्ता मिळावा यासाठी काही उपाय नक्की करून बघा.

कडीपत्ता धुवून कोरडा करा

कडीपत्ता धुतल्यानंतर लगेच ठेवला तर ओलसरपणामुळे पाने काळवंडतात. स्वच्छ कापडावर 20-30 मिनिटे पसरवून पूर्णपणे कोरडा करा. पाने कोरडी नसतील तर साठवण ५-७ दिवसांत खराब होते.

टॉवेलमध्ये गुंडाळा

कोरडा झालेला कडीपत्ता दोन-तीन पेपर टॉवेलच्या मध्ये ठेवा. पेपर टॉवेल अतिरिक्त ओलावा शोषून घेतो आणि पानं तशीच राहतात. नंतर हे गुंडाळलेले टॉवेल हवाबंद पिशवीत ठेवा.

हवाबंद डब्यातच साठवा

कडीपत्ता खुल्या हवेत ठेवला तर पटकन निस्तेज होतो. हवाबंद कंटेनरमध्ये ठेवल्यास ताजेपणा जास्त काळ टिकतो. विशेषतः BPA-free प्लास्टिक किंवा काचेचे जार यासाठी योग्य ठरेल.

फ्रिजच्या व्हेजिटेबल ड्रॉवरमध्ये ठेवा

कडीपत्त्यासाठी थोडं उबदार पण नियंत्रित तापमान योग्य असतं. फ्रिजमधील व्हेजिटेबल ड्रॉवरमध्ये तापमान +3 ते +7 डिग्रीमध्ये राहतं. त्यामुळे पानं जास्त काळ हिरवी राहतात.

देठांसह पानं ठेवा

फक्त पाने वेगळी काढून ठेवल्यास ती लवकर कोमेजतात. देठांसह ठेवले तर पाने नैसर्गिक ओलावा धरून ठेवतात.

सुकलेली पानं काढून टाका

कधी कधी काही पाने साठवताना कोरडी पडतात. अशी पानं स्वयंपाकात लगेच वापरा, पण ती ताज्या पानांसोबत ठेवू नका. एकत्र ठेवले तर ताज्या पानांचा ताजेपणा कमी होतो.

कोणत्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरू नये?

येथे क्लिक करा