Manasvi Choudhary
कडाक्याच्या उन्हाळ्यात बाल्कनीतील झाडे लवकर सुकतात यामुळे रोपांना पाणी कधी घालावे, याविषयी जाणून घेऊया.
उन्हाळ्यात बाल्कनीत बाग फुललेली राहण्यासाठी तुम्ही योग्य वेळेत रोपांना पाणी घालणे महत्वाचे आहे.
झाडांना पाण्याची गरज ही ऋतुप्रमाणे बदलत असते हे लक्षात घ्या. यासाठी उन्हाळ्यात कुंडीत पाणी घालताना जास्त पाणी घालू नये.
उन्हाळ्यात झाडांना सकाळच्या वेळी पाणी घालणे योग्य मानले जाते.सकाळी ५ ते ९ यादरम्यान झाडांना पाणी घातल्याने दिवसभर झाडांना ओलावा मिळतो.
ज्या ठिकाणी रोपांना ऊन लागते अशाठिकाणी रोप ठेवू नका. उन्हापासून रोपांचे संरक्षण करणे महत्वाचे आहे.
प्लास्टिकच्याऐवजी मातीच्या कुंड्यामध्ये रोपे लावा यामुळे माती जास्त वेळ ओलसर राहते रोपाची वाढही चांगली होते.
दुपारी कडाकाच्या उन्हातं झाडांना पाणी घालणे टाळा यामुळे झाडाची वाढ रोखते. पानांना इजा होते.