Sakshi Sunil Jadhav
रोजच्या डब्याला काय न्यायचं? या गृहीणींच्या प्रश्नावर एक भन्नाट रेसिपी आहे.
काकडी, मीठ, कोथिंबीर, लसूण, तेल, डाळं, आलं, नारळ, लाल तिखट, हळद, जिरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता इ.
ताजी काकडी सोलून बारिक चिरून घ्या. तसेच ओला नारळ आणि लसूण चिरून घ्या.
एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे,हिंग,डाळं परता.
आता त्यामध्ये लसूण आणि नारळ घालून परता. तुम्ही सुके खोबरे सुद्धा वापरू शकता.
मग त्यात काकडीचे तुकडे घालून दोन मिनिटे परता आणि गॅस बंद करा.
आता संपुर्ण मिश्रण मिक्सरच्या भांड्यात बारिक वाटून घ्या.
शेवटी पुन्हा कढई गरम करून कडीपत्ता, तेल, हळद, लाल तिखट यांची फोडणी चटणीमध्ये ओतून चपातीसोबत सर्व्ह करा.