शरीरात कसं वाढेल Good Cholesterol? हे पदार्थ करतील मदत

Surabhi Jayashree Jagdish

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे एचडीएल वाढवण्यास मदत करतात. हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते, जे सूज कमी करतात आणि हृदय निरोगी ठेवतात.

फॅटी फिश

फॅटी फिश हे ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्सचा उत्कृष्ट स्रोत आहेत, जे एचडीएल वाढवतात आणि सूज कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करतात.

सुकामेवा आणि बिया

सुकामेवा आणि बियांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स आणि फायबर असते जे एचडीएल वाढवण्यास मदत करते तसंच पचन सुधारतं. मात्र, यात कॅलरी जास्त असल्याने यांचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे गरजेचे आहे.

एवोकॅडो

एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतात. तसंच त्यात फायबरदेखील असतं जे पचनास मदत करतं.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये फ्लॅव्होनॉइड्स असतात जे एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात.

लसूण

लसणामध्ये अँटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये कॅटेचिन्स असतात जे एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात.

Ukdiche Modak : नैवेद्य बनवताना उकडीचे मोदक फुटतायत? 'ही' एक सोपी ट्रिक वापरून तर बघा

येथे क्लिक करा