बँक वेबसाईट खरी की खोटी कशी ओळखायची? या आहेत सोप्या टिप्स

Manasvi Choudhary

बँक

आजकालच्या डिजिटल युगात बँकेच्या लांब रांगेत उभे राहण्याची गरज आता जवळपास संपली आहे. युपीआय अ‍ॅप्स आणि नेट बँकिंगमुळे पैसे ट्रान्सफर करणे, मोबाईल नंबर जोडणे, पत्ता बदलणे किंवा चेकबुक मागवणे ही कामे ऑनलाईनच घरबसल्या करू शकता.

How to Identify a Fake Bank Website

बँक वेबसाईट

परंतु, याच डिजिटल सुविधेचा गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार खऱ्या बँकेसारख्या हुबेहूब फेक वेबसाईट्स तयार करतात. जेव्हा आपण गुगलवर बँकेची माहिती शोधतो, तेव्हा अनेकदा या बनावट साईट्सच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता असते.

How to Identify a Fake Bank Website

खरी आणि खोटी बँक वेबसाईट कशी ओळखायची?

यासाठी खरी आणि खोटी बँक वेबसाईट कशी ओळखायची? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

How to Identify a Fake Bank Website

URL आणि अ‍ॅड्रेस बार तपासा

कोणत्याही अधिकृत आणि सुरक्षित बँक वेबसाईटच्या सुरूवातीला https:// असे दिलेले असते (येथे 's' चा अर्थ Secure असा होतो). तसेच अ‍ॅड्रेस बारमध्ये कुलपाचे (Padlock) चिन्ह असते. जर वेबसाईटची सुरुवात फक्त http:// अशी असेल, तर ती वेबसाईट फेक असू शकते.

HTTPS Check

स्पेलिंग आणि डोमेन नेम तपासा

सायबर ठग खऱ्या बँकेच्या नावासारखेच थोडेफार बदल करून (उदा. स्पेलिंगमध्ये बदल करून) बनावट डोमेन तयार करतात. वेबसाईटचे नाव काळजीपूर्वक वाचा, कारण त्यात अक्षरांची फेरफार केलेली असू शकते.

Domain Name

भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियम

फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना .bank.in हे विशेष डोमेन वापरण्याचे निर्देश दिले आहेत. हे डोमेन अत्यंत सुरक्षित असते आणि कोणतीही सामान्य व्यक्ती किंवा फसवणूक करणारी व्यक्ती सहजासहजी मिळवू शकत नाही. तुमच्या बँकेचे डोमेन अधिकृत असल्याची खात्री करा.

RBI Bank | Google

चुकीच्या लिंकवर क्लिक करणे टाळा

सोशल मीडिया, मेसेज किंवा ईमेलवर आलेली कोणतीही संशयास्पद लिंक उघडून तुमची युजर आयडी, पासवर्ड किंवा पिन टाकणे टाळा. बँक कधीही फोन किंवा मेसेजवर पासवर्ड विचारत नाही.

online Banking process | saam tv

NEXT: पाण्यात की दुधात, ड्रायफ्रुट्स कशामध्ये भिजून खावे?

Soaking Dryfruits In Water Or Milk
येथे क्लिक करा...