Manasvi Choudhary
महिलांची सध्या कॉटन साड्यांना मोठी मागणी आहे. कॉटन साड्या नेसल्यावर लूक उठून दिसतो.
मात्र कॉटन साडीमध्ये मिक्स कॉटन साड्या असतात यामुळे ओरिजनल कॉटन साडी ओळखणे कठीण होते.
साडीचा एक भाग मुठीत घट्ट दाबून धरा. जर सोडल्यावर त्यावर स्पष्ट सुरकुत्या पडल्या, तर ते १००% कॉटन आहे. मिक्स कापडावर सुरकुत्या पडत नाहीत.
साडीवर पाण्याचा एक थेंब टाका. शुद्ध कॉटन पाणी लगेच शोषून घेते आणि पसरते. कृत्रिम धागे पाणी शोषत नाहीत.
साडी प्रकाशात धरून पहा. शुद्ध हाताने विणलेल्या साडीमध्ये धाग्यांचे विणकाम थोडे असमान दिसते, जे तिच्या अस्सलपणाचे लक्षण आहे.
गडद निळा आणि मरून रंगात अजरख डिझाईन सध्या टॉप ट्रेंडमध्ये आहे. हे ऑफिस वेअरसाठी अत्यंत क्लासी दिसते.
सोन्याच्या जरी ऐवजी आता चांदीच्या नाजूक बॉर्डरच्या कॉटन साड्यांची क्रेझ वाढली आहे.
पारंपारिक खण साडीला कॉटनचा टच देऊन वजनाला हलक्या आणि आधुनिक रंगात या साड्या उपलब्ध आहेत.
फिकट गुलाबी, मिंट ग्रीन अशा रंगात हाताने विणलेल्या खादी साड्या 'क्लीन गर्ल' लूकसाठी बेस्ट आहेत.