High blood pressure: कसं ओळखाल की तुमचा रक्तदाब वाढलाय?

Surabhi Jayashree Jagdish

रक्तदाब अचानक वाढणं

रक्तदाब अचानक वाढणं ही एक गंभीर आरोग्य समस्या ठरू शकते. अनेक वेळा यामागे जीवनशैली, ताणतणाव किंवा शरीरातील काही बदल कारणीभूत असतात. पण तुमचा रक्तदाब वाढलाय हे तुम्ही कसं ओळखाल?

sudden BP rise causes

लक्षणं

काही वेळा ब्लड प्रेशर वाढल्याची स्पष्ट लक्षणंही जाणवत नाहीत. त्यामुळे वेळेवर ओळख न झाल्यास हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारखे धोके वाढू शकतात.

hypertension warning signs

मानसिक ताण

अतिरिक्त ताण, चिंता किंवा मानसिक दडपणामुळे रक्तदाब अचानक वाढू शकतो. तणावाच्या वेळी शरीरात हार्मोन्सचे प्रमाण वाढतं आणि त्यामुळे हृदयाची गती वाढते. यामुळे रक्तवाहिन्यांवर दबाव येतो आणि ब्लड प्रेशर झपाट्याने वाढू शकतो.

blood pressure increase

मीठाचं जास्त सेवन

अतिरिक्त मीठ खाल्ल्याने शरीरात सोडियमचं प्रमाण वाढतं. यामुळे शरीरात पाणी साठून रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. विशेषतः प्रोसेस्ड फूड किंवा जंक फूडमुळे हा धोका अधिक वाढतो.

stress and BP

डोकेदुखी

ब्लड प्रेशर वाढल्यावर काही वेळा सौम्य किंवा सतत डोकेदुखी जाणवते. ही वेदना सामान्य थकवा किंवा तणावामुळे आहे असं वाटून दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे हे लक्षण ओळखणं अवघड होतं.

salt intake and hypertension

चक्कर येणं

अचानक चक्कर येणं हेही वाढलेल्या रक्तदाबाचं संकेत असू शकतं. मेंदूपर्यंत रक्तप्रवाहात बदल झाल्यामुळे असं होतं. अनेक वेळा हे लक्षण क्षणिक असल्याने लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.

dizziness BP symptom

दृष्टी धूसर होणं

ब्लड प्रेशर वाढल्याने डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो आणि दृष्टी धूसर होऊ लागते. हे लक्षण तात्पुरतं असलं तरी ते गंभीर संकेत असू शकतो. अनेकदा लोक याला डोळ्यांचा थकवा समजून दुर्लक्षित करतात.

headache high BP

श्वास घेण्यास त्रास

ब्लड प्रेशर जास्त झाल्यास श्वास घेताना त्रास होऊ शकतो. यामागे हृदयावर वाढलेला दबाव कारणीभूत असतो. हे लक्षण हलकं असल्यास लोक ते दुर्लक्ष करतात, पण ते धोकादायक ठरू शकतं.

blurred vision BP

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

येथे क्लिक करा