ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल छोट्या-मोठ्या दुकानांनपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मॅालमध्ये पेमेंटकरिता क्यूआरचा वापर केला जातो.
Phonepe, Google Pay आणि Paytm सारख्या UPI Apps वरुन झटपट पेमेंट करुन टाकतात.
पडताळणीशिवाय QR कोड स्कॅन करणे एक मोठी समस्या बनू शकते.
काही फसवणूक करणारे बनावट QR कोड वापरून तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात.
पैसे भरल्यानंतर, दुकानाच्या ऑडिओ बॉक्समधून येणारा आवाज ऐका. जर आवाज येत नसेल तर सावध रहा.
जर तुम्हाला QR कोडवर विश्नास नसेल तर, गुगल लेन्सने स्कॅन करुन एकदा नक्की चेक करा.
तसेच, पैसे देताना दुकानाचे किंवा मालकाचे नाव पडताळून पहा. जर नाव चुकीचे असेल तर पैसे देऊ नका.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून पैसे मागणारा कॉल किंवा मेसेज आला तर त्या नंबरची त्वरित तक्रार करा.