Priya More
मार्केटमध्ये भेसळयुक्त पनीर विकले जात आहे. पनीर खरेदी करताना ते शुद्ध आहे की भेसळयुक्त हे ओळखता आले पाहिजे.
भेसळयुक्त पनीर खडबडीत आणि रबरासारखे असते.
शुद्ध आणि चांगले पनीर हे मऊ आणि थोडसं लवचिक असते.
भेसळयुक्त पनीरचा रंग खूपच पांढरा किंवा कृत्रिम रंग असतो.
शुद्ध पनीरचा रंग नैसर्गिक पांढरा आणि किंचित पिवळसर असतो.
भेसळयुक्त पनीरला रासायनिक वास येतो आणि ते चवहीन असते.
शुद्ध पनीरला दुधाचा हलका गोड वास येतो आणि त्याची चव नैसर्गिक असते.
भेसळयुक्त पनीर पाण्यात टाकल्यावर ते पटकन विरघळते किंवा त्याचे तुकडे होतात.
शुद्ध पनीर पाण्यात टाकल्यावर हळूहळू ते मऊ होते.
भेसळयुक्त पनीर तव्यावर ठेवल्यावर प्लास्टिकसारखे वितळेल आणि जळाल्याचा वास येईल.
शुद्ध पनीर तव्यावर ठेवल्यावर हळूहळू वितळेल आणि त्याला दुधासारखा वास येईल.